स्थापना १८ जुलै १९४४ ८० वर्षांचा वारसा सातत्याने 'अ' ऑडिट वर्ग
फोन नंबर ०७२२८ २२७०२५ मोबाईल क्र. ९४२१७९०३८४
Email: ner_vks@rediffmail.com GSTN: 27AAAAN0174F1ZW
आपल्या स्वायत्तवांचे संस्थेचे वतीने हार्दिक स्वागत. नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित (र.नं. ५९४) ही गेल्या ८० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित असलेली एक अग्रगण्य संस्था आहे. सातत्याने "अ" अंकेक्षण वर्ग मिळवून आम्ही पारदर्शकतेचा वारसा जपत आहोत.
स्थापना: १८ जुलै १९४४ (८० वर्षांचा समृद्ध वारसा).
सभासद संख्या: २,२९४ (३१.०३.२०२५ पर्यंत).
खेळते भांडवल: २४०९.५० लाख.
वार्षिक लाभांश: १५% (नियमित वाटप).
साठवण क्षमता: ७,९०० मे. टन (१५ स्वतःची गोदामे).
रोजगार निर्मिती: ४३ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आणि १०० व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार.
संस्थेची मुळे: संस्थेची स्थापना १८ जुलै १९४४ रोजी 'नेरपिंगळाई क्रॉप लोन सोसायटी' र.नं. ५९४ या नावाने झाली.
विविधतेकडे वाटचाल: सन १९५७ मध्ये संस्थेचे 'विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये' रूपांतर होऊन खऱ्या अर्थाने विविध व्यवसायांना सुरुवात झाली.
नेतृत्व: संस्थेच्या उभारणीत कॉ. भाई एन. डी. मंगळे व तत्कालीन संस्थापक मंडळींचा मोलाचा वाटा आहे.
वटवृक्षात रूपांतर: संस्थेला आजचे विशाल रूप देण्यात कॉ. नानासाहेब मंगळे, माजी व्यवस्थापक श्री. डि. पी. पाठक, आणि माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक श्री. संजयभाऊ मंगळे यांचे भरीव योगदान लाभले आहे.
शेतमाल तारण व वेअर हाऊसिंग: ५ ठिकाणांहून वेअर हाऊस व्यवसाय चालविला जातो, ज्याचा फायदा दरवर्षी ३५०-४०० शेतकरी घेतात.
आर्थिक सेवा: सोनेतारण कर्ज, सुरक्षित लॉकर सुविधा आणि सभासद बचत योजना.
व्यापारी केंद्र: रासायनिक खते, बि-बियाणे, किटकनाशके, सिमेंट आणि कापड विक्री.
सार्वजनिक सेवा: ३ गावांमधून १० स्वस्त धान्य दुकाने आणि महावितरण वीज बिल संकलन केंद्र.
डिजिटल सेवा: CSC सेंटर (आपले सरकार सेवा केंद्र) द्वारे विविध ऑनलाईन सुविधा.
आम्ही ६ महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहोत: १. नेरपिंगळाई (मुख्यालय) २. राजूरवाडी ३. लेहगांव ४. धामणगांव ५. काटपूर ६. अडगांव
मुख्यालय वेळ: सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ पासून संध्याकाळपर्यंत.
विक्री केंद्र वेळ: सकाळी ८ ते रात्री ८:३० वाजेपर्यंत.
फोन: ०७२२८ २२७०२५.
मोबाईल: ९४२१७९०३८४.
ईमेल: ner_vks@rediffmail.com.
GSTN: 27AAAAN0174F1ZW.